देहदान संकल्प पत्रे भरा.

सह्याद्री निसर्ग मित्र हि गेली २२ वर्ष निसर्ग संवधर्न क्षेत्रात काम करीत आहे. त्याच बरोबर या वर्षा पासुन संस्थेने वैद्यकिय क्षेत्रात काम करण्य़ास सुरुवात केली आहे. त्यामध्ये रक्तदान, देहदान, नेत्रदान या काम चालु आहेत. गेल्या वर्षभरामध्ये ७ नेत्रदान, २ देह्दान व ४ रक्तदान शिबिरे यशस्वी पार पडले आहेत. संस्थेने आता मोठ्या प्रमाणात देहदान संकल्प पत्र भरुन घेण्याचे काम चालू केले आहे.
वैद्यकीय शास्त्राच्या प्रगती साठी व वैद्यकीय महविद्यालयात अध्यायन करणा-या विद्यार्थ्यांकरिता मानवी शरीररचनेचा अभ्यास आवश्यक असतो. एका वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वसाधारण पणे वर्षाला ३०-४० देह अभ्यासासाठी आवश्यक असतात. देह्दात्यांमार्फत दरवर्षी अंदाजे २५ ते ३० देह उपलब्ध होतात परंतु ते पुरेसे ठरत नाहीत. रक्तदान नेत्रदान ह्या संकल्पना आता हळूहळू समाजात रुजू लागल्या आहेत. पण देहदानाबद्दल अजून जनजागृती होणे खुप आवश्यक आहे. त्या साठी चिपळूण मधिल सगळ्यांच्या परिचयाची संस्था सह्याद्री निसर्ग मित्र बि.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्याल यांच्या सह्योगाने पुढाकार घेउन काम करित आहे. डेरवण येथे बि.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्याल हे कोकणातील पहिले अद्ययावत १०० सिट्स चे महाविद्यालय सुरु झाले आहे. देहदाना साठी बि.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालायाने नि:शुल्क रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली आहे.
सर्व साधारणपणे नैसर्गीक मृत्यू दाखला डॉक्टरनी दिल्यावर देह स्वीकारला जातो. परंतू सांसर्गिक रोगाने मृत झालेल्याचा देह स्विकारला जात नाही. उदा. एड्स, कावीळ, कॉलरा, गॅंगरीन, अपघातांत मृत झालेल्याचा, शवविच्छेदन झालेला वगैरे. काही वेळा बराच काळ आजारी स्थितीत असलेल्याचा देह लगेचच सडू लागतो व डॉक्टरांच्या मतांप्रमाणे लगेचच त्यावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक असते. अशाचे देहदान करुन नये. देहदाना ला सर्व धर्मात मान्यता आहे. देहदान केल्यानंतरही धार्मिक विधी करता येतात. पुण्याच्या ’ज्ञानप्रबिधिनी’ तर्फे देहदात्यांच्या मृत्यूनंतर १२/१३ दिवसांनी अत्यंत आवश्यक असलेले धार्मिक विधी त्यांचे पुरोहीत (ह्यांत स्त्रियाही आहेत) मृताचे घरी येऊन अत्यंत अल्प खर्चात करतात. करीत असलेल्या सर्व विधींची माहीतीही तेथें जमलेल्या वारसांना/ नातेवाईकांना देतात.
मरणोत्तर आपला देह सत्कारणी लागावा या हेतुने जास्तीत जास्त लोकांनी आपला देहदाना फ़ॉर्म भरावा व बि.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालातील विद्यार्थीना अध्ययाना साठी त्याचा लाभ करुन द्यावा. संमती पत्र भरताना जवळच्या नातेवाइकाची संमती असणे अवश्यक असते. देहदान संकल्प पत्र भरुन झाल्या नंतर सह्याद्री निसर्ग मित्र संस्थे कडुन देहदान नोंदणी कार्ड देण्यात येते.
मृत्यृ नंतर लवकरात लवकार मेडीकल कॉलेजला देह जाणे आवश्यक असते. देहदान करताना मृत्यु दाखाला असणॆ गरचेचे आहे.
सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेव्दारे हे काम अगदी नि:शुल्क चालु आहे. मृत्यू नंतर १ तासात फक्त फोन करुन कळवा! पुढील सर्व व्यवस्था संस्था करेल.
२४ तास संपर्क – भाऊ काटदरे – ९३७३६१०८१७ ; उदय पंडीत ९८८१५७५०३३
आजच आपला देहदान, नेत्रदानाचा अर्ज भरा. अर्ज भरण्यासाठी संस्थेचा पत्ता
सह्याद्री निसर्ग मित्र
११,युनायटेड पार्क, मार्कंडी, चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५ ६०५. फोन नं. ०२३५५-२५३०३०