रक्तदान शिबीर संपन्न

सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळुण यांच्या वतिने, डेरवण रुग्णालय रक्तपेढी व श्री. देव जुना कालभैरव मंदीर ट्रस्ट यांच्या तर्फ़े सोमवार दि. २९/०६/२०१५ रोजी स. ९ ते दु. २ या वेळेत, श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या “सागर रंगमंच” येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. आपली सामाजिक बांधीलकी ओळ्खुन ३४ लोकानी या शिबीरात येउन रक्तदान केले.

सह्याद्री निसर्गमित्र ही blood donation 29.06.2015संस्था १९९२ साली स्थापन झाली. “ठेवूदुरदृष्टी, रक्षू निसर्ग सृष्टी” हे ब्रिद अंगीकारुन निसर्ग संरक्षण व संवर्धन क्षेत्रात अनेक भरीव कामे केली. त्याचबरोबर संस्था आता, नेत्रदान, रक्तदान व देहदानासारख्या विविध सामाजिक उपक्रमांमधे भाग घेत आहे. गेल्या वर्षभरामधिल संस्थेचे हे चौथे रक्तदानशिबिर संपन्न झाले.
सदर शिबिर साठी श्री. विठठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट चे भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय, रोगनिदान व संशोधन केंद्र व श्री. देव जुना कालभैरव मंदीर यांचे सह्कार्य लभले.

अधिक माहितीसाठी- सह्याद्री निसर्ग मित्र, ११ युनायटेड पार्क, मार्कंडी, चिपळूण येथे भेटावे अथवा उदय पंडीत ९८८१५७५०३३, भाऊ काटदरे ९३७३६१०८१७ यांच्याशी संपर्क साधावा.