Blood Donation

icon-donate-blood

Blood donation is a sign of a healthy person!

Why

If your doctor has cleared you for blood donation that means your hemoglobin is above 12.5, your weight is above 55 and you do not have any other illness. Body takes longer time to regenerate Red Blood Cells and Platelets compared to nutrients, proteins and other elements of blood. Regeneration time may become crucial for accident or ill patients. That’s where YOU can make a difference by donating blood. Somebody’s life may depend on YOUR decision.
Every two seconds there is a blood requirement. About six million units of blood is required per year whereas only three million units are collected. There are about 309 blood banks in Maharashtra supporting blood requirement.

Some facts about blood

 • Blood contains 60% of a liquid called Plasma while Red Blood Cells, White Blood Cells and Platelets constitute remaining 40%
 • Blood cells float in plasma which is a yellow liquid. Plasma contains 90% water and 10% nutrients, hormones, proteins, glucose, gases etc.
 • About 7% of human body weight is made up of blood

How

About every 3 months, Sahyadri Nisarga Mitra arranges a blood donation drive in association with Old Bhairi Temple and Shri Swami Samarth Blood Bank, Dervan. Please register here to be informed about the next date and venue of the blood donation drive.

icon-yes YES

 • Physical: Age above 18, Haemoglobin above 12.5, Weight above 55 Kg
 • Diet: Meal – 3 hours before blood donation. Have some snack after blood donation
 • Any problem post blood donation? Contact blood bank immediately

icon-no NO

 • Smoking within 24 hours
 • Alcohol within 48 hours
 • Heavy meal consisting of sweet or meat on the day of blood donation
 • Do not drive heavy vehicle on the day of blood donation

FAQ

Will I get tired after blood donation?

Normal healthy person does not feel tired after blood donation. Please make sure to have the offered breakfast post blood donation. Doctors check hemoglobin level and blood pressure before blood donation. Consume more liquid and maintain normal diet after blood donation.

What about office / work?

After taking some rest / relaxation post blood donation one can continue routine work.

Do I now have 350 ml blood less in my body?

If doctor has cleared you for blood donation do not worry. You will have sufficient blood in your body.

I am healthy but above 60 years, can I donate?

Medically, yes. But in India the right age has been set as above 18 and below 60.

If I am diabetic can I donate blood?

Person whose blood sugar level are controlled can donate blood.

Which tests are performed before blood donation?

Weight > 55 Kg, HB > 12.5, Blood Group – Any, Blood Pressure and Heartbeat – normal

Which tests are performed by the blood bank on collected blood?

Jaundice (Hepatitis B & C) · Malaria · HIV (AIDS) test · Venereal disease (STD) · Blood Group · Before issuing blood, compatibility tests (cross matching).

These tests are time consuming so they cannot be performed during a blood donation drive but are performed post drive.

Do I need to worry about chances of contracting blood communicable diseases by donating blood?

No, using sterilized disposable bleeding sets is a mandate for every blood bank.

icon-donate-blood

रक्तदान – जीवनदान

रक्तदान का करावे?

आज विज्ञान व तंत्रज्ञानाने किती ही प्रगती केली असली तरीपण काही गोष्टींचे गूढ अजूनही कायम आहे. मानवाला अजूनपण कृत्रिमरित्या रक्ताची निर्मिती करता आलेली नाही. म्हणूनच अपघातग्रस्त रुग्णांना अथवा लहानमोठ्या शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज भासल्यास मानवी रक्तच उपयोगाला येते. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतात. म्हणूनच रक्तदानाला जीवनदान असेही म्हणतात.
सुदृढ माणसाच्या शरीरात साधारण ५ – ६ लिटर रक्ताचे अभिसरण होत असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. या रक्ताचे पुढील १ ते २ दिवसात पुनरुत्पादन होते. परंतु अपघातग्रस्तरुग्णांसाठी हा काळ खूपच चिंताजनक असतो. अश्यावेळी कोणीतरी दान केलेले रक्तच त्यांच्या कामी येते. हे कोणीतरी तुम्ही असू शकता!
आपण ज्या समाजात राहतो, त्याचे ऋण फेडण्यासाठी रक्तदान ही एक उत्तम संधी आहे. दर २ सेकंदाला कुठेतरी रक्ताची गरज असते. दर वर्षी साधारण ६ दशलक्ष युनिट रक्ताची आवश्यकता असते परंतु केवळ ३ दशलक्ष युनिट रक्तच उपलब्ध होते. महाराष्ट्रात एकूण ३०९ रक्तपेढ्या अविरतपणे रक्त साठवून गरजवंतांपर्यंत पोहोचवत आहेत.

रक्तदान कोण करू शकते?

या व्यक्ती रक्तदानास पात्र आहात:

 1. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त आहे
 2. वजन ५५ किलोपेक्षा जास्त आहे
 3. वय १८ ते ६० मध्ये आहे
 4. इतर कोणतेही आजार नाहीत
 5.  मागील ३ महिन्यात रक्तदान केलेले नाही

तुम्हाला हे माहित आहे का?

 • रक्तातील ६०% प्रमाण हे प्लास्मा या द्रवस्वरूपी घटकाचे असते. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी व प्लेटलेट्स यांचे प्रमाण ४०% आहे.
 • प्लास्मा हे पिवळ्या रंगाचे द्रव असून यावर रक्तपेशी तरंगतात. प्लास्मामध्ये ९०% पाणी असते तर इतर १०% प्रमाण हे पोषकसत्वे, संप्रेरके, प्रथिने, ग्लूकोज इ. चे असते.
 • मानवी शरीराच्या एकूण वजनापैकी ७% वजन रक्ताचे आहे

रक्तदान कसे कराल?

दर ३ महिन्यांनी सह्याद्री निसर्ग मित्र रक्तदान शिबिराचे आयोजन करते. या कार्यास, जुना भैरी मंदिर देवस्थान व श्री स्वामी समर्थ रक्तपेढी यांचेही मोलाचे सहकार्य लाभते. पुढील शिबिराच्या माहितीसाठी sahyadricpn@gmail.com

रक्तदान करताना:

 • रक्तदानापूर्वी ३ तास आधी जेवण/न्याहारी करावी
 • रक्तदानानंतर लगेच थोडीशी न्याहारी करावी
 • रक्तदान करण्यापूर्वी २४ तास धुम्रपान करू नये
 • रक्तदान करायच्या ४८ तास आधी मद्यपान करू नये
 • रक्तदानाच्या दिवशी जेवणात गोड अथवा मांसाहारी पदार्थांचा समावेश नसावा
 • रक्तदानाच्या दिवशी अवजड वाहने चालविणे टाळावे
 • रक्तदानानंतर काही अडचण आल्यास त्वरित रक्तपेढीशी संपर्क साधावा

तुम्हाला हे प्रश्न पडले आहेत का?

 • रक्तदान केल्यावर मला थकवा येईल का?
  रक्तदानाच्या आधी डॉक्टर तुमचे हिमोग्लोबीन व रक्तदाब तपासतात. त्यामुळे सुदृढ माणसाला रक्तदान केल्यावर थकवा जाणवत नाही. रक्तदानानंतर शिबिरात दिलेली न्याहारी मात्र पूर्ण खावी. रक्तदान केल्यानंतर तुमचा रोजचा आहार तुम्ही घेऊ शकता. शक्यतो त्या दिवशी आहारात पोषक द्रव पदार्थांचे सेवन जास्त करावे.
 • रक्तदान केल्यावर मी माझी बाकी काही कामे करू शकेन का?
  रक्तदानानंतर काही वेळ आराम करून तुम्ही तुमची रोजची कामे नेहमीसारखी करू शकता. तुम्ही तुमच्या कामाच्या जागीसुद्धा नेहमीसारखे जाऊ शकता.
 • माझ्या शरीरात आता पुरसे रक्त आहे का?
  रक्तदान करताना फक्त ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. तुमच्या शरीरात अजूनपण पुरेसे रक्त शिल्लक राहते व तुमच्या शरीराचे कार्य नक्की सुरळीतपणे चालेल.
 • मी सुदृढ असून माझे वय ६० पेक्षा जास्त आहे. तरीपण मी रक्तदान करू शकतो का?
  वैद्यकीयदृष्ट्या हो. परंतु आपल्या देशात फक्त १८ ते ६० या वयोगटातील सुदृढ व्यक्ती रक्तदान करू शकतात.
 • मला मधुमेह आहे. मी रक्तदान करू शकतो का?
  ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आहे तेच मधुमेही रक्तदान करू शकतात.
 • रक्तदान करण्यापूर्वी कोणत्या चाचण्या करतात?
  रक्तदानाच्या आधी तुमचे वजन, हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्तदाब व हृदयाचे ठोके यांची तपासणी करतात
 • रक्तदानानंतर रक्तावर काही चाचण्या करतात का?
  रक्तदानापश्चात रक्तावर खालील चाचण्या करतात:
  • कावीळ (हिपेटायटिस बी व सी साठी)
  • मलेरिया चाचणी
  • एचआयव्ही (एडस्) चाचणी
  • असुरक्षित यौनसंबंधांमुळे होणाऱ्या रोगांबाबतची चाचणी
  • रक्तगट तपासणी
  • रुग्णाला रक्त देताना रक्तदात्याचे रक्त व रुग्णाचे रक्त एकमेकांस अनुकूल आहेत का हे ही तपासले जाते.
  • या तपासण्या करण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. त्यामुळे या चाचण्या प्रत्यक्ष रक्तदानाच्या वेळी न करता रक्तदानानंतरच करता येतात.
 • रक्तदान केल्यामुळे मला काही रक्तातून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा धोका आहे का?
  तुम्हाला कोणताही संसर्गजन्य आजार अथवा संसर्गजन्य रोग होणार नाही कारण रक्तदानासाठी फक्त एकदाच वापरता येतील अश्या पूर्णपणे निर्जंतुक सुया वापरणे बंधनकारक आहे.