Body Donation

icon-body-donation

Body donation shows how serious we are towards development of medical sciences

Why

Body donation helps to study and cure various diseases. Anatomy is the most important step for all branches of medical sciences which cannot be effectively studied using models, photos or computer simulation. Dissection of a dead body is the best method to study this subject.
Medical Council of India directs medical colleges to ensure one dead body among 8 first year students. Reality of low body donation practice in India skews the ratio to one body among 20 students. Considering about Ten Thousand medical students of all branches per year, the real requirement is about 1,000 to 1,200 body donations per year which is very low compared to the death rate of 7.35. (Death rate indicates the number of deaths during the year per 1,000 population).
Though large number of unclaimed bodies is not uncommon in India but the police enquiries and other clearances make it difficult using such bodies in medical colleges.
On accepting donated body medical college injects 5 liters of formalin through neck before using it for studies.
If you are serious about advancement in medical sciences, pledge to donate your body.


How

 • Multiple studies have attributed low body donations towards lack of awareness among general public. Sahyadri will try and bridge the gap by conducting awareness drives in Chiplun Tehsil.
 • Please register with Sahyadri Nisarga Mitra for Body Donation. Sahyadri will send this form to the hospital at Dervan who will issue you a certificate.
 • Inform next-of-kin about your decision.
 • Let everyone in your circle know about your decision encouraging them too. Use social media effectively for this cause.
 • If next-of-kin decides for body donation of deceased loved ones, call volunteers of Sahyadri Nisarga Mitra immediately. Sahyadri will arrange a hearse van from Krishna Medical College for no charges. Please note that the van will arrive in 2-3 hours considering about 100 Km distance from Karad to Chiplun.
 • Death certificate and request letter from next-of-kin is mandatory for body donation
 • Anatomy Act 1948 has been uniformly adopted in all states. In Maharashtra, Anatomy Act was adopted as Bombay Anatomy Act 1949. It was further amended in 2000 permitting donation before death of one’s body or any other part after death by a person to hospital, medical institutes for education and research.

FAQ

Where do they accept donated body?

All Government Medical Colleges in Maharashtra accept donated body.

Which documents are required for body donation?

 • Death Certificate
 • Request letter of next-of-kin

Is it mandatory to donate only at the place issuing body donation certificate?

No. Body can be donated to any Government Medical College.

देहदान का करावे?

आपल्या देशाने इस्रो सारख्या संस्थेने केलेल्या सखोल अभ्यासामुळे अंतराळात खूप मोठी झेप घेतली आहे. या आणि यासारख्या अनेक वैज्ञानिक पैलूंवर आपला देश आघाडीवर आहे. परंतु दुर्दैवाने, वैद्यकीय क्षेत्रात आपली म्हणावी तितकी प्रगती झालेली नाही. आजही आपल्या देशात शस्त्रक्रियेचे नव-नविन तंत्रज्ञान तसेच नविन औषधे बाहेरच्या देशातून येतात. तुम्ही आपल्या देशाच्या वैद्यकीय प्रगतीसाठी हातभार लावाल का?

आपल्या देशातील वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व होतकरू डॉक्टरांना अॅनॅटोमी अर्थात शरीरशास्त्र हा अत्यंत क्लिष्ट पण अतिशय महत्त्वाचा विषय शिकविला जातो. या विषयाच्या सविस्तर अभ्यासासाठी नमुने, फोटो किंवा कॉम्प्युटर सिम्युलेशन यांचा फारसा उपयोग होत नाही. मृत शरीराचे विच्छेदन अर्थात dissection केल्याशिवाय हा विषय समजायला सोपा होत नाही. देहदानामुळे शरीराच्या अनेक बाबींचा या विद्यार्थ्यांना खोलवर अभ्यास करता येतो. त्यामुळे विविध शारीरिक व्याधींचा व्यवस्थित अभ्यास करून त्यावर उपयुक्त औषध तयार करण्यास नक्कीच मदत होईल.

सर विल्लीयम हार्वे ह्यांनी रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला. यासाठी त्यांना गौरान्वित करण्यात आले. मृतदेहाच्या अभ्यासाशिवाय हा शोध लागणे केवळ अशक्य होते.

भारतीय वैद्यकीय परिषद अर्थात मेडिकल कौन्सील ऑफ इंडिया ने केलेल्या निर्देशानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्षाच्या दर ८ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी १ मृत शरीर देणे गरजेचे आहे. परंतु, आपल्या देशात देहदानाचे प्रमाण अत्यल्प असल्याने एका मृत शरीराच्या अभ्यासासाठी २० विद्यार्थी जमा होतात. दर वर्षी जर संपूर्ण भारतात सर्व शाखांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे १०,००० विद्यार्थी आहेत असे गृहीत धरले, तर दर वर्षी अंदाजे १००० ते १२०० मृतदेहांची गरज आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, आपल्या देशाचा मृत्यदर ७.३५ आहे. मृत्युदराच्या तुलनेत देहदानाचे प्रमाण खूपच कमी आहे असे हा दर असे सुचवितो.

भारतात बेवारस शवांची असंख्य गणती आहे. परंतु पोलीस तपास आणि इतर कार्यवायांमध्ये प्रचंड वेळ जातो आणि असे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणे दुरापास्त होते.

मृतदेह प्राप्त झाल्यावर तो कुजून खराब होऊ नये व त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी लाभ व्हावा म्हणून या मृत शरीरात इंजेक्शनच्या सहाय्याने ५ लिटर फोर्मालीन सोडले जाते.

तुम्ही आपल्या देशाला वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासात अग्रेसर बनवू शकता. यासाठी आजच मृत्यू पश्चात देहदानाचा दृढ निश्चय करा.

देहदान कसे कराल?

 • देह्दानाबद्दल लोकांमध्ये पुरेशी जागृती नाही व त्याबाबतची माहितीसुद्धा नाही असे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे. चिपळूण तालुक्यात देह्दानाबद्दल पुरेशी जागृती निर्माण करण्याचे काम सह्याद्री निसर्ग मित्रने हाती घेतले आहे.
 • आपण जर देहदानाचा संकल्प केला असल्यास याची माहिती सह्याद्री निसर्ग मित्रला अवश्य द्यावी. यासाठी आवश्यक ती कार्यवाही झाल्यावर सह्याद्री ही माहिती डेरवण येथील हॉस्पिटलला पाठवेल.
 • आपल्या या निर्णयाची माहिती आपल्या कुटुंबाला नक्की द्यावी.
 • आपल्या आप्तेष्ट व मित्र-परिवाराला देखील आपल्या या निर्णयाची माहिती घ्यावी. या अतीउत्तम निर्णयाची दखल घेऊन ते सुद्धा देह्दानासाठी प्रेरित होतील.
 • देहदानाचा संकल्प केलेली व्यक्ती निधन पावल्यास, कुटुंबातील इतर व्यक्तींनी सह्याद्री निसर्ग मित्रशी अथवा सह्याद्रीच्या स्वयंसेवकांशी त्वरित संपर्क साधावा. सह्याद्री निसर्ग मित्र आपल्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण/ कृष्णा आयुर्विज्ञान, कराड येथे नेण्यासाठी शववाहिनीची विनामूल्य व्यवस्था करेल.
 • मृताच्या नातेवाईकांनी मृत्यूचा दाखला व विनंती पत्र यांची पूर्तता करावी. या कागदपत्रांशिवाय देहदान पूर्णत्त्वास जाऊ शकत नाही.
 • देह्दानाला कायदेशीररित्या ही मान्यता आहे. सन २००० साली झालेल्या बॉम्बे अॅनॅटोमी अॅक्टमधील सुधारणेनुसार मानवी शरीर कोणत्याही हॉस्पिटल अथवा वैद्यकीय संस्थांना अभ्यास व संशोधनासाठी देण्यास कायद्याने परवानगी आहे. संपूर्ण शरीर अथवा शरीरातील काही अवयव ही दान करता येऊ शकतात.

देह्दानाबाबत तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का?

 • देह्दानासाठी मृत शरीर कुठे स्वीकारण्यात येते?
  महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दान केलेला देह स्विकारला जातो.
 • देह्दानासाठी काही कागदपत्रे लागतात का?
  देहदाना साठी फ़क्त मृत्युचा दाखला व नातेवाईकाचे संमतीपत्र यांची आवश्यकता असते.
 • जेथे संमतीपत्र भरले तेथेच देहदान करणे अनिवार्य आहे का?
  नाही. कोण्यातीही शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आपण देहदान करु शकतो.
 • देहदाना नंतर कोणकोणते अवयव रोपणासाठी वापरले जातात?
  देहदाना नंतर सर्व अवयव मृत होतात त्यामुळे कोणताही अवयव रोपणासाठी वापरता येत नाही.  देहदानानंतर देह वैद्यकिय विद्यार्थांना शिक्षणासाठी वापरला जातो.