Eye Donation

icon-donate-eyes

India needs approximately 140,000 eye donors as of today.

Why

Approximately 12 million people in India are blind of which 1% (about 122,000) are bilaterally corneal blind. Out of this approximately 60,000 can be delivered vision by penetrating keratoplasty. In addition 20,000 new cases of corneal blindness are being added annually. Considering maximum utilization of collected corneas, backlog of corneal blindness and annual addition of fresh cases of corneal blindness – India needs approximately 140,000 eye donors as of today. As per National Program to Control Blindness (NPCB) statistics for 2014-15 only 40,621 eyes have been collected as of 3rd Mar 2015. Numbers clearly show the efforts required to meet the target.

Following shows state wise number of collection of donated eyes

State

Collection of donated eyes

Gujarat 8547
Tamilnadu 8189
Maharashtra 6945

Source: NPCB State wise data


How

The eye donation process means removal of only the cornea which is about 0.5 mm thick tissue (layer) covering iris and pupil. This process has to take place within 6 hours of death. The next-of-kin can take eye donation decision even if there is no formal consent of the deceased. Please note that this process is done by doctors and the face does not get damaged at all.

If you wish to donate eyes of your beloved ones, please:

 • Call volunteers of Sahyadri Nisarga Mitra – Mr. Bhau Katdare – 9423 831700 OR Mr. Uday Pandit – 9881 575033. The volunteers and concerned doctor will reach the place within 1 hour
 • Keep the eyes of the deceased person closed and covered with moist cotton
 • Switch off the fan directly over the deceased person
 • Raise the head of the deceased by about six inches, if possible

Post eye donation collected cornea is stored in M-K medium and taken to Drushti Daan Eye Bank, Sangli. The Eye Bank will inform the hopeful recipient for further process. You will get a call from the Eye Bank next day and will receive the certificate of Eye Donation within a week’s time.


What does eye donation mean?

The eye donation process means removal of only the cornea which is about 0.5 mm thick tissue layer covering the iris and pupil. Please note that the entire eye is NOT removed for eye donation.

What is Eye Bank?

Eye Bank is a non-profit organization that collects Corneas, performs transplants and encourages people for eye donation. There are 309 eye banks (as of May 2015) in Maharashtra.

What happens post eye donation?

The collected cornea is stored in M-K medium which is used for transplant within 72 hours. The eye bank informs two hopeful recipients from their list. The transplant procedure is done only after confirming that HIV and Hepatitis blood reports of the deceased are negative.

Does the cornea get sold?

Never. The recipient does not have to pay for the cornea. Only the nominal charges of hospitalization and medicine are taken by the hospital that undertakes the transplant procedure. Though the name of the recipients are never disclosed the donor’s relatives are informed after the transplantation.

Can the eye donation process happen at home?

Yes. It can happen where the body is.

icon-donate-eyes

नेत्रदान – श्रेष्ठदान

मोर पिसारा फुलवून नाचताना किती छान दिसतो ना? उंच कड्यांवरून भर पावसात कोसळणाऱ्या धबधब्याच्या सौंदर्याचे किती वर्णन करावे! अंधाऱ्या रात्रीतल्या टिपूर चांदण्याने भरलेलं आभाळ किती सुरेख दिसते! या सर्व सुंदर गोष्टींचा मनसोक्त आनंद तुम्ही घेऊ शकलात ना? हाच आनंद अजून कोणालातरी तुमच्यामुळे मिळू शकतो. यासाठी फक्त मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करा! आणि अजून दोन व्यक्तींना ही सृष्टी किती सुंदर दिसते याची अनुभूती येईल.

आजमितीला भारतातील अंध लोकांची संख्या १२,०००,००० इतकी आहे. यातील १ % लोकांना म्हणजे अंदाजे १,२०,००० लोकांना बुब्बुळातील दोषांमुळे अंधत्व आलेले आहे. यातील निम्म्या लोकांना म्हणजेच साठ हजार लोकांना केवळ नेत्रबुब्बुळ रोपणामुळे दृष्टी मिळू शकते. याशिवाय दर वर्षागणिक अजून २०,००० लोकांना अंधत्व येते. या सगळ्या गोष्टी विचारात घेता, आज घडीला आपल्या देशाला सुमारे १,४०,००० नेत्रदात्यांची गरज आहे. स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर अंधत्व नियंत्रणासाठीचा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार मार्च २०१६ अखेर फक्त ५९,१६३ डोळे दान करण्यात आले. यावरून नेत्रादात्यांची आणि नेत्रदानाची किती तातडीची गरज आहे हे दिसून येते.

खालील तक्त्यात संकलित दान स्वरूपातील नेत्रांचा आकडा दिलेला आहे.

अनु.क्र. राज्याचे नाव संकलित डोळे
तामिळनाडू ११०५१
गुजरात ८४३६
महाराष्ट्र ७३०१

कसे करतात नेत्रदान?

नेत्रादान म्हणजे केवळ डोळ्यांच्या आत ०.५ मि.मी इतका पातळ असलेला डोळ्याचा कॉर्निया काढण्यात येतो. ही प्रक्रिया निधनानंतर ६ तासांच्या आत होणे अत्यंत आवश्यक आहे. मृत व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला नसला तरीपण त्यांचे नेत्रदान करता येऊ शकते. यासाठीचा निर्णय मृत व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने घ्यावा. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वकरित्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत केली जाते. यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा अजिबात विद्रूप होत नाही.

तुमच्या प्रियजनांचे नेत्रदान करायचे असल्यास हे नक्की करा!

 • सह्याद्री निसर्ग मित्र अथवा त्यांच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधा. संपर्कासाठीचा दूरध्वनी क्र. ९३७३६१०८१७ (श्री. भाऊ काटदरे) किंवा ९८८१५७५०३३ (श्री. उदय पंडित) असे आहेत. सह्याद्रीचे स्वयंसेवक व संबंधित डॉक्टर तासाभरात तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतील.
 • स्वयंसेवक अथवा डॉक्टर येईपर्यंत निधन झालेल्या व्यक्तीचे डोळे मिटून ठेवावे. तसेच डोळ्यांवर ओल्या कापसाचा बोळा ठेवावा.
 • मृत व्यक्तीला पंख्याच्या वाऱ्यापासून शक्य तितके लांब ठेवावे.
 • मरण पावलेल्या व्यक्तीचे डोके शक्यतो उशीवर ठेवावे.

नेत्रदानानंतर डोळ्याचा कॉर्निया रक्षण व पोषणासाठी एम-के मिडीयममध्ये ठेवला जातो. त्यानंतर तो सांगली येथील दृष्टीदान नेत्रपेढीमध्ये सुपूर्द करण्यात येतो. नेत्र पेढीकडून तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी फोन करण्यात येईल व नेत्रदानाचे प्रमाणपत्र एका आठवड्यात मिळू शकेल. नेत्रपेढी त्यांच्याकडील यादीत असलेल्या अंध व्यक्तींना शास्त्रक्रियेसाठी सूचित करते. त्यानंतर लवकरच नेत्र पेढीकडून तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे डोळे अंध लोकांना शास्त्रक्रियेमार्फत प्रत्यारोपित करण्यात आल्याचा निरोप येईल.

तुम्हालाही हे प्रश्न पडले आहेत का?

 • नेत्रदान म्हणजे नक्की काय असते?
  नेत्रादान म्हणजे केवळ डोळ्यांच्या आत ०.५ मि.मी इतका पातळ असलेला डोळ्याचा कॉर्निया काढणे. ही प्रक्रिया निधनानंतर ६ तासांच्या आत होणे अत्यंत आवश्यक आहे. नेत्रदानामध्ये संपूर्ण डोळा काढला जात नाही.
 •  नेत्रपेढी म्हणजे काय असते?
  नेत्रपेढीचे काम कॉर्नियाचा संग्रह करणे, त्यांचे योग्यरित्या संरक्षण करणे, त्यांचे अंध व्यक्तींना नेत्र शस्त्रक्रियेसाठी वाटप करणे आणि लोकांना नेत्रदानासाठी उद्युक्त करणे असे आहे. यासठी नेत्रपेढीला कोणताच नफा होत नाही. महाराष्ट्रात मे २०१५ अखेर, अश्या एकूण ३०९ नेत्रपेढ्या आहेत.
 • नेत्रदानानंतर काय होते?
  मृत व्यक्तीचा कॉर्नियाचा एम-के मिडीयम मध्ये संचय करण्यात येतो. त्यानंतर त्याचे ७२ तासांच्या आत शास्त्रक्रियेमार्फात अंध व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करण्यात येते. नेत्रपेढीकडून नेत्रदात्याच्या नातेवाईकांना दोन पात्र अंध व्यक्तींची नावे कळविण्यात येतात. मृत व्यक्तीला एच.आय.व्ही आणि कावीळ (हिपेटायटिस) नव्हता याची खात्री झाल्यावरच पुढील प्रक्रिया केली जाते.
 • या कॉर्नियाची कुठे विक्री केली जाते का?
  हा कॉर्निया कुठेही विकला जात नाही. ज्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळते त्यालादेखील कॉर्नियासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. त्याला केवळ हॉस्पिटलचा व औषधांचा खर्च स्वतः करावा लागतो. नेत्रदात्याच्या नातेवाईकांना शास्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी नेत्र-प्रत्यारोपणाची माहिती कळविली जाते.
 • नेत्रदानाची प्रक्रिया घरी होऊ शकते का?
  ही प्रक्रिया मृत शरीर जेथे आहे तेथे करता येते. यासठी घरून हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.