नेत्रवंदना – कथ्थक नृत्याद्वारे नेत्रदात्यांना वंदन

netra-vandana-4

सह्याद्री निसर्ग मित्र च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात झालेल्या दहा नेत्रदात्यांना कथ्थक नृत्याद्वारे वंदन करण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या हॉल मध्ये सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. नेत्रवंदना या कार्यक्रमाने नेत्रदात्यांना वंदन व त्यांच्या आप्तस्वकियांचा गौरव करण्यात येणार आला. या कार्यक्रमासाठी चिपळूण मधील नेत्रदान चळवळीचे आधारस्तंभ डॉ. ग. ल. जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. मीरा पोतदार यांच्या प्रास्ताविकानी झाली. स्कंधा चितळे – नृत्य मल्हार, कथ्थक नृत्य अकॅडेमी यांच्या कथ्थक नृत्याने सभागृह भाराऊन गेले. त्यांनी एका नृत्यामध्ये डोळ्याला पट्टी बांधून अंधत्व म्हणजे काय असते याची जाणीव करुन दिली. या नृत्याने उपस्थितांचे मन भाराऊन गेले.

netra-vandana-1

सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष श्री. भाऊ काटदरे यांच्या हस्ते चिपळूण मधील नेत्रदान चळवळीचे आधारस्तंभ डॉ. ग. ल. जोशी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. ग. ल. जोशी यांनी नेत्रदान चळवळीत मोलाची कामगिरी केली असून आता पर्यंत १५ यशस्वी नेत्रदान केले आहेत. मा. डॉ. अनुप सदाफळे (नॅब, चिपळूण) व श्री. सुधीरशेठ तलाठी यांचे स्वागत सह्याद्री निसर्ग मित्रचे सेक्रेटरी श्री. उदय पंडीत यांनी केले.

या वर्षात कै. वसुधा रघुनाथ जोशी, कै. भाग्यश्री भरत सुतार, कै. गणपत गंगा गंगाराम गमरे, कै. गंगाधर श्रीपाद भिडे, कै. काशिनाथ सदाशीव वासुरकर, कै. शैलजा सुरेश जोशी, कै. जयंत विष्णु जोशी, कै. सुलोचना विश्वनाथ वाडेकर, कै. कुसुम गजानन देवधर, कै. शरयु केशव जोशी यांचे नेत्रदान झाले असून त्यांचे नातेवाईक डॉ.प्रा. शाम रघुनाथ जोशी, श्री. भरत सुतार, श्री. चंद्रकात गणपत गमरे, श्रीमती. सुमन गंगाधर भिडे, श्रीमती. मिनाक्षी सदाशीव वासुरकर, श्री. संतोष सुरेश जोशी, डॉ. प्रशांत पटवर्धन, श्री. सुनील विश्वनाथ वाडेकर, डॉ. हेमंत गजानन देवधर, श्री. वसंत केशव जोशी यांना सन्मानपत्र व आभारपत्र देऊन गौरवण्यात आले.

netra-vandana-2

नेत्रदान पंधरवड्या निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील या वेळी करण्य़ात आले. या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चिपळूण तालूक्यातून ९३ निबंध प्राप्त झाले. सदर निबंध स्पर्धेमध्ये सर्वच गटांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. “नेत्रदान” या विषयावर वेगवेगळ्याप्रकारे निबंध लिहिण्यात आले. सदर निबंध स्पर्धेमध्ये शालेय गटात कु. अंकिता संतोष पवार – प्रथम, कु. सायली रविंद्र पाटील द्वितीय, चि. अजय दत्ताराम ताम्हणकर तृतीय क्रमांक, तर महाविद्यालयीन गटात कु. वर्षाली बाळ शिरकर प्रथम, कु. शिवानी प्रविण पाटील द्वितीय, कु. श्रध्दा शाम पालांडे तृतीय क्रमांक व खुल्या गटामध्ये सौ. पुष्पा व्ही. साळुंखे प्रथम, श्री. रविंद्रकुमार सी. जाधव द्वितीय, सौ. मंजिरी मनिष दळवी तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले. सर्वाना प्रमाणपत्रे व रोख बक्षीसाने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

netra-vandana-3

नेत्रदान करण्याची इच्छा जरी नोंद केली असेल तरी मृत्यू नंतर जवळच्या नातेवाईकांनी ती इच्छा पूर्ण केली तरच यशस्वी नेत्रदान होते. याचा विचार करता मृत्यू पावणा-या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांनी दु:खाच्या काळात सामाजिक भान राखत खंबीरपणे केलेली नेत्रदान ही अंधासाठी एक महान उपलब्द्धी असते. याचा विचार करुन हा खास गौरव करण्यात आला. या गौरवामुळे अधिकाधिक नेत्रदाते पुढे येतील यासाठी हा प्रयत्न आहे.

सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणच्या वतीने व दृष्टीदान आय बॅंक सांगली व चिपळूण मधील सर्व नेत्रतज्ञ यांच्या सहकार्याने नेत्रदान मोहीम चालू करण्यात आली आहे. सदर मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १७ नेत्रदानातून ३४ व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली आहे.
नेत्रदान म्हणजे मृत्युनंतर माणसाच्या डोळ्यातील कॉर्निया काढून तो अंध व्यक्तीला बसवणे.

netra-vandana-5

जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजेच ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यामध्ये दर वर्षी ४० ते ५० हजारांची भर पडत असते. या अधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्द्ध झाले तर त्यांच्या जीवनातील अंध:कार दूर होऊ शकेल. नेत्रदान मृत्युनंतर ६ तासांच्या आत करणे आवश्यक असते. या मध्ये पूर्ण डोळा काढला जात नाही तर फ़क्त डोळ्यातील कॉर्निया काढून घेतला जातो. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी २० ते २५ मिनीटांचा वेळ लागतो. भारतात सद्यस्थितीला १ लाख ४० हजार व्यक्ती कॉर्निया उपलब्द्ध नसल्याने अंध आहेत. प्रतिवर्षी आपण ४० ते ४५ हजार एवढेच कोर्नया नेत्रदानातून जमा करु शकलो आहोत. प्रतिवर्षी एक लाख कॉर्निया जमवणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

netra-vandana-6 netra-vandana-7 netra-vandana-8 netra-vandana-9 netra-vandana-10 netra-vandana-11 netra-vandana-12 netra-vandana-13 netra-vandana-14 netra-vandana-15